Shreya Maskar
डाळ धुऊन कुकरमध्ये डाळ, पाणी, हळद, टोमॅटो आणि मिरच्या घालून 3–4 शिट्ट्या द्या. शिजलेली डाळ छान फेटून घ्या.
कढईत तूप गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण, हिंग घालून फोडणी तयार करा. त्यात लाल तिखट घालून लगेच डाळ ओता. मीठ घालून 2–3 मिनिटे उकळी येऊ द्या. या डाळीला हेल्दी बनवायचे असेल तर यात खालील पदार्थ मिक्स करा.
डाळीत लिंबाचा रस घालणे अत्यंत फायदेशीर आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची चयापचय क्रिया वाढवते. जेव्हा चयापचय क्रिया जलद होते, तेव्हा अतिरिक्त चरबी देखील लवकर जळते.
आलं- लसूण हे नैसर्गिक फॅट बर्नर मानले जाते. त्यामध्ये असलेले विशेष घटक शरीराची पचनशक्ती वाढवतात आणि चरबी लवकर कमी करण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील सूज देखील कमी होते.
हिरव्या मिरच्या चयापचय क्रिया वाढवतात आणि चरबी झटपट कमी होते. कोथिंबीर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि अतिरिक्त पाणी कमी करण्यास मदत करते.
हळदीमध्ये दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हळद चरबीयुक्त ऊतींवर नियंत्रण ठेवण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.
हिरव्या पालेभाज्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. तसेच कमी कॅलरी असतात. त्यामुळे डाळीमध्ये थोडी पालेभाजी टाका.
डाळ बनवताना त्यात जास्त तूप किंवा लोणी घालणे टाळा. मीठ जपून वापरा, कारण अतिरिक्त सोडियममुळे शरीरात पाणी साठून राहते. तसेच झटपट वजन देखील वाढते.