Shreya Maskar
बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढत असेल तर सकाळी हेल्दी नाश्ता करा. नाश्त्याला पालक-चणा कटलेट्स बनवा. रेसिपी खूपच सोपी आहे.
पालक- चणा कटलेट्स बनवण्यासाठी चणे, पालक, बटाटे, पुदिना, हिरवी मिरची, जिरेपूड, धणेपूड, हळद, गरम मसाला, मीठ आणि ब्रेडक्रम्ब्स किंवा ओट्स इत्यादी साहित्य लागते.
पालक- चणा कटलेट्स बनवण्यासाठी सर्व प्रथम चणे आणि पालक कुकरमध्ये उकडवून घ्या. ओट्समधील उच्च फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि अतिरिक्त कॅलरीजचे सेवन टळते.
आता एका बाऊलमध्ये उकडलेले चणे, उकडलेला पालक, मॅश केलेले बटाटे, पुदिना आणि हिरव्या मिरच्या घालून मिक्स करा.
यात जिरे पूड, धणे पूड, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले एकजीव करा. आता मिश्रणाचे छोटे गोळे करून कटलेट्स बनवा आणि ब्रेडक्रम्ब्स किंवा ओट्समध्ये घोळवा.
पॅनमध्ये १-२ थेंब तेल टाकून त्यात पालक- चणा कटलेट्स भाजून घ्या. तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत याचा आस्वाद घ्या.
पालकमध्ये कमी कॅलरीज, उच्च फायबर असते. त्यामुळे पोट भरलेले राहते, भूक कमी लागते, चयापचय (metabolism) वाढवते.
चण्यामध्ये प्रथिने, फायबर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.दररोज मूठभर भाजलेले किंवा भिजवलेले चणे खाल्ल्याने चयापचय सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.