Shreya Maskar
ताडगोळा या फळामध्ये कमी कॅलरीज, भरपूर फायबर , भरपूर पाण्याचे प्रमाण असते. बद्धकोष्ठता , ऍसिडिटी आणि पोटातील जळजळ कमी करण्यास ताडगोळा मदत करतो.
ताडगोळा फळाचे फ्रेश सॅलड बनवण्यासाठी ताडगोळा, टरबूज, लेट्यूस, काकडी, पुदिन्याची पाने, नारळाचे पाणी, आमचूर पावडर, चाट मसाला, मीठ आणि काळी मिरी इत्यादी साहित्य लागते.
ताडगोळा फळाचे सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम ताडगोळ्याची तपकिरी साल काढून त्याचे लहान तुकडे करा. तुकडे जास्त मोठे कापू नका.
मोठ्या बाउलमध्ये ताडगोळ्याचे छोटे काप, टरबूज, लेट्यूस, काकडी यांचे देखील छोटे छोटे काप करून टाका. काकडीचे प्रमाण जास्त ठेवा.
त्यानंतर मिश्रणात बारीक चिरलेली हिरवीगार पुदिन्याची पाने, कोथिंबीर देखील तुम्ही टाकू शकता.
शेवटी सॅलडमध्ये नारळाचे पाणी, आमचूर पावडर, चाट मसाला मीठ आणि काळी मिरी टाकून चांगले मिक्स करा. जेवताना किंवा सकाळी ब्रेकफास्टला तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता.
ताडगोळामध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रक्टोज असते, जे वजन न वाढवता शरीराला ऊर्जा देते. तसेच हा पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अधिक काळ ताजेतवाने वाटते.
ताडगोळ्यात ८५-९०% पाणी असते. हे शरीर हायड्रेटेड ठेवते आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.