Shreya Maskar
नाचणी-ओट्स ढोकळा बनवण्यासाठी नाचणीचे पीठ, ओट्सचे पीठ, उडीद डाळीचे पीठ, दही, मीठ, लाल मिरची पूड, बेकिंग सोडा, इनो पावडर, तेल, मोहरीचे तेल, हिरवी मिरची आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
नाचणी-ओट्स ढोकळा बनवण्यासाठी नाचणी आणि ओट्सचे पीठ एकत्र करा. त्यात उडीद डाळीची पावडर आणि दही घाला. चांगले मिसळून पाणी घालून मिश्रण तयार करा.
आता हे मिश्रण झाकून रात्रभर किंवा ६-८ तास उबदार जागी आंबवण्यासाठी ठेवा. त्यानंतर आंबवलेले मिश्रण बाहेर काढून ते चांगले फेटून घ्या.
त्यात मीठ, जिरे, लाल मिरची, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आले घाला.
तयार केलेल्या पिठात इनो पावडर घालून मिसळा. मिश्रण तेल लावलेल्या ताटात काढून शिजवा. तुम्ही कुकर आणि स्टीमरचा वापर करू शकता.
ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी तेलात मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण ढोकळ्यावर घाला आणि तुमचा नाचणी-ओट्सचा ढोकळा तयार आहे.
नाचणीमध्ये कमी कॅलरीज असतात. तसेच यात फायबर भरपूर असते. त्यातील पोषक घटकांमुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखली जाते.
ओट्समध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात; यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि अतिखाणे टाळले जाते. चयापचय क्रिया नैसर्गिकरित्या सुधारते.