Weight Loss Recipe : रात्रीच्या जेवणाला खा 'हा' पदार्थ, वजन होईल कमी अन् चवही लागले भारी

Shreya Maskar

वजन कमी

तुमचे वजन वाढले असले किंवा तुम्हाला वजन कायम नियंत्रणात ठेवायचे असेल तर डाएटमध्ये पनीरचा समावेश करा. तुम्ही नाश्त्याला, रात्रीच्या-दुपारच्या जेवणाला पनीर भुर्जी खा.

Weight Loss | pinterest

पनीरचे फायदे

पनीरमध्ये उच्च प्रथिने, कमी कर्बोदके असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. पनीर खाणे चयापचय वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच स्नायू मजबूत होतात आणि फॅट बर्न करण्यास मदत होते.

Paneer | yandex

पनीर भुर्जी

पनीर भुर्जी बनवण्यासाठी पनीर, कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, लोणी, तेल, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Benefits of Paneer | yandex

कांदा

पनीर भुर्जी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करून घ्या.

Onions | yandex

आलं-लसूण पेस्ट

मिश्रणात आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून एक मिनिट परता. गॅस मंद आचेवर ठेवून द्या. जेणेकरून मसाला जळणार नाही.

Ginger-Garlic Paste | yandex

टोमॅटो

आता यात टोमॅटो, हळद, लाल मिरची आणि मीठ घाला. टोमॅटो विरघळेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवा.

Tomatoes | yandex

पनीर

आता तुम्ही यात बारीक केले पनीरचे तुकडे टाका आणि सर्व नीट एकजीव करा. तुम्ही यात किसलेला पनीर देखील टाकू शकता.

Paneer | yandex

कोथिंबीर

पनीर भुर्जी मंद आचेवर ३-४ मिनिटे शिजवा. नंतर गरम मसाला आणि हिरवीगार कोथिंबीर घालून मिक्स करा. अशाप्रकारे पनीर भुर्जी तयार झाली आहे.

Coriander | yandex

NEXT : ना डाएट, ना औषधं; सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक, ७ दिवसांत वजनात दिसेल फरक

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा...