Weight loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा ओट्सचा 'हा' चटपटीत पदार्थ, वजन होईल कमी अन् दिसाल स्लिम- ट्रिम

Shreya Maskar

वजन कमी

ओट्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचा एक विशिष्ट विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक लागत नाही.

lose weight | pinterest

ओट्स

ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो. ते हळूहळू पचत असल्यामुळे, ते रक्तामध्ये ग्लुकोज नियंत्रणात ठेवते. यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढत नाही. वजन कमी होण्यास मदत मिळते.

Oats | pinterest

कॅलरीच कमी

ओट्समध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला याचे आवर्जून सेवन करा. नाश्त्याला चटपटीत ओट्स टिक्की बनवा.

Low in calories | pinterest

ओट्स टिक्की

ओट्स टिक्की बनवण्यासाठी ओट्सचे पीठ, पनीर, रताळे, हिरव्या भाज्या, ढोबळी मिरची, कोबी, कांदा, मिरची, आले, मीठ, हळद, लिंबाचा रस, चाट मसाला आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Oats Tikki | pinterest

पनीर

ओट्स टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पनीर किसून घ्या, नंतर त्यात उकडलेले आणि मॅश केलेले रताळे घाला.

paneer | pinterest

कोथिंबीर

मिश्रण २- ३ मिनिटे परतल्यावर त्यात किसलेले आले, मीठ, मीठ, मिरचीचे तुकडे, हळद, चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिक्स करा.

Coriander | pinterest

हिरव्या भाज्या

त्यानंतर यात हिरव्या चिरलेल्या भाज्या घाला. सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात ओट्सचे पीठ मिक्स करून पीठ मळून घ्या.

Green vegetables | pinterest

तूप

तयार पीठाचे छोटे छोटे गोळे करून टिक्की करून घ्या. पॅनमध्ये एक थेंब तूप टाकून टिक्की दोन्ही बाजूंनी फ्राय करा आणि दहीसोबत खा.

Ghee | pinterest

NEXT : सकाळच्या नाश्त्याला १० मिनिटांत बनवा 'ही' रेसिपी, झपाट्याने वजन होईल कमी

Weight Loss Recipe | pinterest
येथे क्लिक करा...