Shreya Maskar
ओट्समध्ये उच्च फायबर आणि प्रथिने असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. हे कमी कॅलरीजचे असून पचनक्रिया सुधारतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला ओट्स डोसा बनवा.
ओट्स डोसा बनवण्यासाठी ओट्स, पाणी, उडीद डाळ, भिजवलेले मेथीचे दाणे, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, आले, जिरे, मीठ आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
ओट्स डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम ओट्स पाण्याने धुवा. ओट्सचा चिकटपणा घालवण्यासाठी २ कप पाण्यात भिजवा.
डोसा सहज पसरण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी उडीद डाळ हलकी भाजून घ्या. भाजलेली डाळ मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर बनवा.
भिजवलेल्या ओट्समधील पाणी एका भांड्यात काढून घ्या. त्यात ताजे पाणी घालून ओट्स धुवा. आता हे ओट्स मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या.
ओट्समध्ये मेथीचे दाणे, कांदा, कढीपत्ता आणि आलं घालून पेस्ट बनवा. पेस्ट जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावी.
तयार मिश्रणात चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर आणि उडीद डाळीची पावडर घालून चांगले मिसळा.
पॅनला तेल लावून त्यावर डोशाचे मिश्रण पसरवा. डोसा दोन्ही बाजूंनी खुसखुशीत भाजून घ्या. पुदिना चटणीसोबत ओट्स डोसा खा.