Weight Loss Recipe : रोज सकाळी करा 'हा' नाश्ता, वजन होईल कमी अन् पोटाची ढेरी गायब

Shreya Maskar

वेट लॉस रेसिपी

तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर मूग डाळीचा चिला हे बेस्ट नाश्ता आहे. हा नाश्ता फक्त १० - १५ मिनिटांत बनतो.

Weight Loss Recipe | pinterest

मूग डाळीचे फायदे

मूग डाळीमध्ये उच्च प्रथिने, फायबर भरपूर असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. वारंवार भूक लागत नाही आणि चयापचय सुधारून कॅलरीज लवकर बर्न होतात.

Benefits of Moong Dal | pinterest

मूग डाळ चिला रेसिपी

मूग डाळ चिला बनवण्यासाठी एक कप मूग डाळ एका बाउलमध्ये किमान ३ तास भिजवून ठेवा. तुम्ही रात्री भिजवून सकाळी त्याचा वापर करू शकता.

Moong Dal Chilla Recipe | pinterest

डाळ

त्यानंतर डाळ धुवून पाणी काढून टाका आणि मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्या. डाळ वाटताना त्यात मिरची, आले आणि जिरे मिक्स करा.

Dal | pinterest

पाणी

पाणी कमी वाटल्यास चमच्याने थोडे पाणी घालून बारीक पेस्ट बनवा. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि चांगले फेटून घ्या. यात चिमूटभर हिंग, हळद, धणे आणि मीठ घालून मिक्स करा.

Water | pinterest

ऑलिव्ह तेल

आता तयार पेस्ट गरम नॉन-स्टिक पॅनवर पळीने छान पसरवा. पॅनला थोडे ऑलिव्ह तेल लावा आणि झाकण ठेवा. मध्यम आचेवर मूग डाळ चिला चांगला शिजवून घ्या.

Olive Oil | pinterest

चटणी-दही

तयार मूग डाळीचा चिला तुम्ही कोथिंबीर चटणी आणि दह्यासोबत खाऊ शकता. हा नाश्ता केल्याने पोटाची अतिरिक्त चरबी कमी होईल.

Chutney & Yogurt | pinterest

वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर साखर, मैदा, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, फास्ट फूड, गोड पेये, बेकरी उत्पादने खाणे टाळा.

Sugar | pinterest

NEXT : वजन कमी करण्यासाठी डाएटवर आहात, मग 'ही' हाय प्रोटीन रेसिपी एकदा ट्राय कराच

Weight Loss Recipe | pinterest
येथे क्लिक करा...