Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर सकाळच्या नाशत्याला हाय प्रोटीनने भरपूर असलेले काळ्या चण्याचे सूप प्या. चण्यातील प्रथिने, फायबर, लोह आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
काळ्या चण्याचे सूप बनवण्यासाठी काळे चणे, टोमॅटो, तमालपत्र , लसूण, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लोणी इत्यादी साहित्य लागते.
काळ्या चण्याचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम चणे रात्रभर किंवा ७-८ तास भिजवून ठेवा. चणे पूर्णपणे भिजल्यावर, मऊ झाल्यावर त्यातून पाणी काढून टाका आणि धुवा.
आता चणे प्रेशर कुकरमध्ये घालून चांगले उकडून घ्या. त्यात पाणी आणि इतर मसाले घाला. टोमॅटोचे मोठे तुकडे करा आणि चण्यांसोबत उकळी काढा.
चण्यामध्ये मीठ, तमालपत्र आणि आठ ते दहा काळी मिरी घाला. झाकण लावून २-३ शिट्टी काढून घ्या. हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
प्रेशर कुकरमध्ये चणे शिजल्यावर, ते बाहेर काढा. उकडलेले चणे आणि टोमॅटो मिक्सरमध्ये घालून पाणी टाका वाटून घ्या.
एका पॅनमध्ये लोणी टाकून त्यात लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून दोन मिनिटे परतून घ्या. आता तयार केलेली चण्याची पेस्ट घाला. घट्टपणा कायम ठेवण्यासाठी चण्यांचे पाणी घाला.
सूप दोन मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. चवीनुसार मीठ घाला आणि गॅस बंद करा. अशाप्रकारे काळ्या चण्याचे सूप तयार झाले.