Shreya Maskar
डार्क चॉकलेट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, पण त्याचे प्रमाण मर्यादित असावे. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते, जे भूक नियंत्रित करण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करते. दररोज चॉकलेटचे ३ ते ४ तुकडे खा.
डार्क चॉकलेट मूस बनवण्यासाठी डार्क चॉकलेट, कोल्ड क्रीम, अंडी, साखर, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
डार्क चॉकलेट मूस बनवण्यासाठी सर्वप्रथम डबल बॉयलरमध्ये चॉकलेट गरम करा. त्यानंतर क्रीम घट्ट होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
एका बाउलमध्ये अंड्याचा पांढरा भाग वेगळा फेटून घ्या. त्यात कमी प्रमाणात साखर घालून चांगले फेटून घ्या. यात कोल्ड क्रीम आवश्यकतेनुसार टाका.
तयार मिश्रण आता फ्रिजमध्ये थंड करायला ठेवून द्या. जवळपास ५-६ तासात डार्क चॉकलेट मूस खाण्यासाठी तयार होईल.
ड्रायफ्रूट्समध्ये फायबर, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि खाण्याची तीव्र इच्छा कमी होते. वजन कमी करण्यासाठी, बदाम, अक्रोड, अंजीर आणि पिस्ते यांचे सेवन करा.
तुम्ही साखरेऐवजी मध देखील डार्क चॉकलेट मूस टाकू शकता. मात्र प्रमाण कमी घ्या. कारण डार्क चॉकलेट आधीच थोडे गोड असते.