Weight Loss Recipe : ना साखर, ना मैदा; 'अशा' बनवा डाएट कुकीज, वजन कमी करण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Shreya Maskar

डाएट कुकीज

तुम्ही वजन कमी करत असाल आणि तुम्हाला गोड कुकीज किंवा बिस्किट खायचे असतील तर घरीच डाएट कुकीज बनवा. यामुळे तुमची वजन वाढणार नाही आणि पोटही भरेल.

Diet Cookies | pinterest

बाजरी कुकीज

वजन कमी करण्यासाठी बाजरी कुकीज खूप फायदेशीर ठरतील. यासाठी तुम्हाला बाजरीचे पीठ, गूळ, तूप, वेलची पूड, चिमूटभर मीठ आणि दूध इत्यादी साहित्य लागते.

Bajra Cookies | pinterest

बाजरीचे पीठ

बाजरीचे कुकीज बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये बाजरीचे पीठ, वेलची पूड आणि मीठ एकत्र करा. यांचे योग्य प्रमाण ठेवा.

Bajra Flour | pinterest

गूळ

पॅनमध्ये तूप आणि किसलेला गूळ विरघळेपर्यंत गरम करा. हे मिश्रण बाजरीच्या पीठात मिक्स करा. मिश्रण सतत ढवळत रहा. जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही.

Jaggery | pinterest

दूध

पीठ मऊ मळून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार थोडे दूध घाला. आता पीठाचे लहान गोळे बनवा, त्यांना थोडे चपटे करा आणि कुकीजचा आकार द्या.

Milk | pinterest

बेक करा

आता कुकीज बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये सुमारे १२ ते १५ मिनिटे बिस्किटे बेक करा. जेणेकरून कुकीज खुसखुशीत होतील.

Baking | pinterest

टीप

लक्षात ठेवा, ओव्हन आधीच गरम करणे आवश्यक आहे, नाहीतर कुकीज खराब होतील. बेक होताना त्यातून मंद सुगंध येईल. कुकीज सोनेरी तपकिरी झाल्यावर, त्यांना बाहेर काढून थंड होऊ द्या.

Note | pinterest

बाजरी वजन कमी करण्यासाठी कशी फायदेशीर?

बाजरीमध्ये उच्च फायबर, प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे पचायला वेळ घेतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, भूक कमी लागते. परिणामी वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Weight Loss | pinterest

NEXT : घरी बनवलेल्या दह्याला पाणी सुटते? फक्त वापरा 'ही' एक ट्रिक, मिळेल घट्ट दही

Curd Making Tips | pinterest
येथे क्लिक करा...