Shreya Maskar
लापशी ही गव्हाच्या किंवा जवची बनवली जाते. ज्यात फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर ठरतात.
सकाळी लापशीचा नाश्ता केल्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. लापशी हळूहळू पचते, त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.
गहू किंवा जवमधील उच्च फायबरचे प्रमाण पोट स्वच्छ ठेवण्यास, ॲसिडीटी टाळण्यास मदत करते. सकाळी लापशी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
लापशी बनवण्यासाठी लापशी, तेल, जिरे, चिरलेला कांदा, लसूण, गाजर, घेवडा, वाटाणे, मिरची, टोमॅटो, हळद, कोथिंबीर, लिंबू , मीठ, पाणी आणि तुमच्या आवडीच्या भाज्या इत्यादी साहित्य लागते.
लापशी बनवण्यासाठी सर्वप्रथम तूप किंवा तेल न वापरता लापशी हलकी भाजून घ्या. शिजवण्यापूर्वी लापशी धुवून १० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
कुकरमध्ये थोडे तूप गरम करून त्यात जिरे घाला. बारीक चिरलेला कांदा आणि लसूण हलके परतून घ्या, नंतर सर्व भाज्या घालून ४-५ मिनिटे शिजवा.
मिश्रणात हळद, मीठ आणि हिरव्या मिरच्या घाला. आता भिजवलेली लापशी आणि पाणी घाला. मध्यम आचेवर ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कुकर थंड झाल्यावर लापशी काढून एका बाउलमध्ये काढा. वरून लिंबू आणि कोथिंबीर घालून गरमागरम खा.
वजन कमी करण्यासाठी लापशीमध्ये जास्त तेल किंवा तूप घालणे टाळा. जास्त बटाटे घालणे टाळा. लापशीमध्ये जास्त भाज्या खा. मीठ मर्यादित टाका. तुम्ही यात मूग डाळ देखील टाकू शकता.