Weight Loss Bhakri Recipe : ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ; वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी फायदेशीर?

Shreya Maskar

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी ज्वारी आणि नाचणी यांची भाकरी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, कॅलरीज कमी असतात आणि पोषक तत्त्वे भरपूर असतात, ज्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

Weight Loss | pinterest

ज्वारीची भाकरी

ज्वारीची भाकरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने, ज्वारी चयापचय आरोग्यास मदत करते आणि शरीराला स्थिर ऊर्जा पुरवते.

Jowar Bhakri | pinterest

नाचणीची भाकरी

नाचणीची भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सर्वात कमी (४०-५५) असतो; ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वजन व्यवस्थापनासाठी ती अत्यंत गुणकारी आहे.

Nachni Bhakri | pinterest

ज्वारीची भाकरी साहित्य

ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ, गरम पाणी, मीठ, कोरडे पीठ इत्यादी साहित्य लागते. पीठ आणि पाण्याचे योग्य प्रमाण घ्या, जेणेकरून ज्वारीची भाकरी नीट बनेल.

Bhakri | pinterest

ज्वारीचे पीठ

परातीत १ कप ज्वारीचे पीठ घ्या आणि त्यात मीठ मिसळा. पीठात हळूहळू गरम पाणी घालून कणिक मळा. जेणेकरून पीठ अधिक मऊ होईल.

Jowar Flour | pinterest

पीठ मळा

मळलेल्या पीठाचे ३-४ लहान ते मध्यम आकाराचे गोळे बनवा. पीठाचा एक गोळा हाताने थोडा चपटा करा, त्याला कोरड्या ज्वारीच्या पीठात घोळवून घ्या. हाताच्या तळव्याने आणि बोटांनी पीठावर दाब देत भाकरी थापा, जेणेकरून तिचा पातळ आणि गोलाकार आकार तयार होईल.

Flour | pinterest

कोरडे पीठ

भाकरी पृष्ठभागाला चिकटू नये म्हणून आवश्यकतेनुसार वरून कोरडे पीठ लावत राहा. त्यानंतर एक लोखंडी तवा मध्यम-तेज आचेवर गरम करा. भाकरी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.

Dry Flour | pinterest

भाकरी कधी खावी?

वजन कमी करण्यासाठी दररोज दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात १ ते २ मध्यम आकाराच्या ज्वारी, नाचणीच्या भाकरी खाणे योग्य आहे.

Bhakri | pinterest

NEXT : बाजारात मिळतो तसा 'आम पापड' घरीच बनवा, मुलांसाठी आंबट-गोड चवीचा खाऊ १० मिनिटांत तयार

Aam Papad Recipe | saam tv
येथे क्लिक करा...