Shreya Maskar
आम पापड बनवण्यासाठी आंबे, साखर, काळे मीठ , चाट मसाला इत्यादी साहित्य लागते. आंबे थोडे कच्चे घ्या, जेणेकरून पापड चवीला छान आंबट-गोड लागतील.
आम पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून त्यांची साल काढून गर काढून घ्या. आता याची एक गुळगुळीत प्युरी बनवा. आंब्याची प्युरी बनवताना गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
आता ही प्युरी एका पातेल्यात ओतून मंद आचेवर शिजवायला ठेवा. मिश्रण तळाला चिकटू नये म्हणून त्यात साखर घालून सतत ढवळत राहा.
सुमारे १० ते १५ मिनिटे शिजवल्यानंतर जेव्हा प्युरी घट्ट होऊ लागेल, तेव्हा त्यात काळे मीठ आणि चाट मसाला घाला. यांचे योग्य प्रमाण घ्या.
जेव्हा मिश्रण घट्ट आणि चिकट होईल, तेव्हा गॅस बंद करा आणि ते थोडे थंड होऊ द्या. शेवटी एका ताटाला तूप लावून त्यात आंब्याचे मिश्रण पातळ थरात पसरवा.
आता हे मिश्रण सुकण्यासाठी उन्हात, पंख्याखाली ठेवून द्या. एक बाजू पूर्णपणे कोरडी झाल्यावर ती पलटा आणि दुसरी बाजूही कोरडी करा. मिश्रण पूर्णपणे कोरडे झाल्यावर वेगवेगळ्या आकारांमध्ये कापा.
घरी बनवलेले आंब्याचे पापड पूर्णपणे शुद्ध आणि रसायनमुक्त असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात कमी-जास्त साखर घालू शकता. लहान मुल उन्हाळ्याच्या सुट्टीत हे आवडीने खातील.
पापड पूर्णपणे सुकल्याशिवाय ताटातून काढू नये, अन्यथा तो चिकट राहतो. तयार झालेला आम पापड हवाबंद डब्यात साठवा, जेणेकरून वर्षभर चांगले टिकतील.