Weight Loss Drink Recipe : पाणी, लिंबू अन्...; २ मिनिटांत बनवा 'हे' ड्रिंक, पोटावरची चरबी झटपट होईल कमी

Shreya Maskar

वेट लॉस ड्रिंक

वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी पाणी, लिंबू, सब्जाच्या बिया, मध इत्यादी साहित्य लागते. तुम्ही याचे योग्य प्रमाण घ्या.

Weight Loss Drink | pinterest

सब्जाच्या बिया

वेट लॉस ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप पाणी उकळा. त्यात लिंबाचा रस, सब्जाच्या बिया आणि मध घालून एकत्र करा. वेट लॉस ड्रिंकला एक उकळी काढून घ्या.

Sabja | pinterest

वेट लॉस ड्रिंक कधी प्यावे?

तयार वेट लॉस ड्रिंक रोज सकाळी रिकामी पोटी प्या. जेणेकरून पोटाची अतिरिक्त चरबी झटपट कमी होईल आणि तुम्ही स्लिम-ट्रिम दिसाल.

healthy drinks | pinterest

लिंबू

लिंबाची चव आंबट असते. ते पचनक्रिया सुधारते, भूक वाढवते आणि चयापचय क्रिया सुधारते. त्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते.

Lemon | pinterest

मध

मध भूक कमी करण्यास आणि कॅलरीज जलद गतीने जाळण्यास मदत करते. हा एक आयुर्वेदिक फॅट बर्नर आहे, जो साखर खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करतो. परिणामी वजन घटते.

Honey | pinterest

कोमट पाणी

कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया उत्तेजित होते आणि चरबी जाळण्यास मदत होते. ते चरबीच्या पेशींचे विघटन देखील करतात, ज्यामुळे पचनसंस्था सुधारते.

Warm Water | pinterest

सब्जा

सब्जा वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पोट बराच वेळ भरलेले ठेवते आणि भूक कमी करते. पाण्यात भिजवल्यावर फुगणारे हे बी कॅलरी-मुक्त असते आणि चयापचय सुधारण्यास मदत करते.

Sabja | pinterest

टीप

कोणत्याही वेट लॉस ड्रिंकमध्ये साखर घालणे टाळा, कारण साखरेमुळे कॅलरीज वाढतात आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसते. तुम्ही गूळ किंवा मधाचा वापर करा.

disclaimer | pinterest

NEXT : ताडगोळा सॅलड कधी खाल्लं आहे का? वजन कमी करण्यासाठी वरदान

Weight Loss Recipe | saam tv
येथे क्लिक करा...