Shruti Vilas Kadam
वजन कमी करताना डाळी, कडधान्ये, अंडी, दही, पनीर आणि इतर प्रोटिन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. प्रोटिनमुळे पोट भरलेले राहते.
पालक, मेथी, कोबी, गाजर, काकडी, सफरचंद आणि पपई यांसारख्या भाज्या व फळांचा आहारात समावेश करा. त्यातील फायबर आणि इतर पोषक घटक आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गव्हाची पोळी यांसारखे पर्याय आहारात समाविष्ट करा. धान्यांमुळे फायबरमुळे पोट भरते. वजन कमी करण्यासाठी भात किंवा पोळी पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही.
कोल्ड ड्रिंक्स, साखर घातलेले ज्यूस, मिठाई, केक आणि बिस्किटे यांचे सेवन कमी करा. या पदार्थांमधून खूप जास्त कॅलरीज मिळू शकतात. त्याऐवजी साधे पाणी आणि कमी साखर असलेले पर्याय निवडा.
फ्रेंच फ्राइज, चिप्स, समोसे, पिझ्झा आणि बर्गर यांसारखे पदार्थ वारंवार खाणे टाळा. यांमध्ये कॅलरीज, मीठ किंवा फॅटचे प्रमाण जास्त असू शकते. घरचे ताजे अन्न नेहमी बेस्ट.
पौष्टिक पदार्थ असले तरी ते गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॅलरीज वाढतात. जेवणात भाज्या, प्रोटिन आणि धान्यांचा समतोल ठेवा. नेहमी भूकेपेक्षा २ घास कमीच जेवण करा
वजन कमी करण्यासाठी जेवणासोबत नियमित शारीरिक हालचालही महत्त्वाची आहे. चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा शरीराला झेपेल असा व्यायाम करा.