Shreya Maskar
तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल पण तुम्हाला चटपटीत, कुरकुरीत आणि हेल्दी खायचे असेल तर पनीर पकोडा किंवा पनीर भजी एकदा नक्की ट्राय करा.
पनीर पकोडा बनवण्यासाठी बेसन, पनीर, बटाटे, कांदे, हिरव्या मिरच्या, मीठ, लाल तिखट आणि हळद इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
पनीर पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथभ बटाटे कुकरला चांगले उकडून घ्या आणि त्यानंतर कांदे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
दुसरीकडे पनीर स्वच्छ धुवून तो चांगला किसून घ्या. लक्षात ठेवा भजीमध्ये पनीरचे प्रमाण जास्त आणि बटाट्याचे खूपच कमी असावा.
एका बाऊलमध्ये बेसन, किसलेला पनीर, उकडलेला छोटा बटाटा, कांदे, हिरव्या मिरच्या, मीठ, लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करा. यात लाल तिखट थोडेच टाका.
एअर फ्रायरमध्ये बटर पेपर ठेवा आणि त्यावर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ठेवून द्या. १५ ते २० मिनिटांत कुरकुरीत पनीर भजी तयार होतील.
तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर पॅनमध्ये एक थेंब तूप टाकून पनीर पकोडे गोल्डन फ्राय करून घ्या. याला थोडा वेळ लागेल पण डाएटसाठी हे फायदेशीर ठरेल.
भजी बनवण्यासाठी लो फॅट पनीरची निवड करावी. तसेच बेसनमध्ये उच्च प्रथिने आणि फायबरचे प्रमाण असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, परिणामी कॅलरीचे सेवन कमी होते.