Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी चिया सीड खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी नाश्त्याला चिया सीड स्मूदी प्या.
चिया सीड स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम पिकलेले केळ ब्लेंडरमध्ये टाकून प्युरी बनवा. यात कमी फॅटचे दही मिक्स करा.
चवीसाठी, अर्धा चमचा कोको पावडर टाका, किंवा त्याऐवजी स्ट्रॉबेरी किंवा पीनट बटर वापरू शकता.
त्यानंतर यात एक चमचा मध टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर यात काजू, बदाम किंवा अंजीर यांचे तुकडे देखील टाका.
शेवटी चिया सीड्स आणि चांगले मिक्स करा. वरून बारीक चिरलेले बदाम टाकून चिया सीड स्मूदीचा आस्वाद घ्या.
चिया सीड्समध्ये उच्च प्रमाणात फायबर असते. पाण्यात भिजवल्यावर हा पदार्थ जेलसारखा बनतो. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे कॅलरीजचे सेवन कमी होते.
चिया सीड्समध्ये प्रथिने , ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे चयापचय क्रिया वेगवान करतात. हे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करण्यास मदत करतात.
चिया सीड्समध्ये स्वतःच्या वजनापेक्षा १० पट जास्त पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे शरीरातील आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो, त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचा मऊ राहते. यात असलेल्या मुबलक अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. सुरकुत्या, बारीक रेषा चेहऱ्यावर येत नाही.