Shreya Maskar
तुम्हाला महिन्याभरात वजन कमी करायचे असेल तर ग्रिल पनीर आणि व्हेजिटेबल सँडविच खा. हा डाएट पदार्थ आठवड्यातून ३-४ वेळा नाश्त्याला खा. तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
ग्रिल पनीर आणि व्हेजिटेबल सँडविच बनवण्यासाठी दही, किसलेले गाजर, कोबी, काळी मिरी, ढोबळी मिरची, उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, पनीर आणि ब्रेड इत्यादी साहित्य लागते.
ग्रिल पनीर आणि व्हेजिटेबल सँडविच बनवण्यासाठी ग्रीक योगर्ट वापरा. वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
ग्रिल पनीर आणि व्हेजिटेबल सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये घट्ट दही घ्या. त्यात गाजर, कोबी, ढोबळी मिरची बारीक कापून टाका.
आता पनीरचे बारीक तुकडे करून पॅनमध्ये थोडे रोस्ट करून घ्या. त्यानंतर ते एका ताटात काढून थंड होऊ द्या. पनीरमधील पोषक घटक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
त्यानंतर मिश्रणात उकडलेले मका, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. मसाला मिश्रणाला संपूर्ण लागेल याची काळजी घ्या.
आता ब्रेडच्या २ स्लाइसच्या कडा कापून घ्या. ब्रेडवर २ मोठे चमचे तयार केलेले दह्याच्या सँडविचचे मिश्रण पसरवा, त्यावर दुसरा ब्रेड ठेवून हलकेच दाबा , अशाप्रकारे ग्रिल पनीर आणि व्हेजिटेबल सँडविच तयार आहे.
जर तुम्हाला सँडविच टोस्ट, ग्रिल करायचे असेल तर पॅनमध्ये एक थेंब तेल टाकून त्यावर ४-५ मिनिटांसाठी सँडविच भाजा.