Shreya Maskar
तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर डाएटमध्ये आताच हे डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करा. यामुळे १०-१५ दिवसांत तुमच्या वजनात फरक दिसायला लागेल.
डिटॉक्स ड्रिंकमुळे चयापचय क्रिया वाढवून वजन कमी होण्यास मदत मिळते. हे डिटॉक्स ड्रिंक केवळ वजन कमी करत नाही तर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
पाण्यात बडीशेप, जिरे, ओवा आणि ताज्या पुदिन्याची पाने रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी गाळून प्या. हे पाणी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी प्यायचे आहे.
तुम्ही हे पाणी दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणातही पिऊ शकता. तसेच यात सब्जाच्या बिया टाकल्यास डिटॉक्सचा प्रभाव आणखी वाढतो. बडीशेप पचनक्रिया सुधारते. गॅस होत नाही, त्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.
डिटॉक्स ड्रिंकमुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच त्वचा उजळ होते. डिटॉक्स वॉटर शरीराला आतून शुद्ध करते, चयापचय सुधारते आणि पोटाची चरबी कमी करून वजन कमी करते.
पुदिना हा एक नैसर्गिक शीतल पदार्थ आहे, तो शरीरातील उष्णता कमी करतो. त्वचेचा दाह, पिंपल्स, मुरुमांना आराम देतो. तसेच त्वचेला तरुण आणि ताजेतवाने ठेवतो.
डिटॉक्स ड्रिंकसोबत संतुलित आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा. चांगल्या परिणामांसाठी हे पेय किमान ३-४ आठवडे प्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.