Shreya Maskar
अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम करतात. मात्र तरीही त्यांचे वजन कमी होत नाही किंवा हे सर्व करताना त्यांना अशक्त वाटते, त्यामुळे वजन कमी करताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घेऊयात.
बऱ्याच लोकांना असे वाटते की, जेवढे आपण कमी खाऊ तेवढे वजन कमी होईल. पण हे चुकीचे आहे. Excessive कॅलरीज कमी केल्याने पोषक तत्वांची कमतरता आणि चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते.
एकाच प्रकारचा व्यायाम केल्याने शरीराच्या केवळ विशिष्ट भागांवरच परिणाम होतो. यामुळे वजन कमी करणे कठीण होऊ शकते. म्हणून, कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लवचिकतेचे व्यायाम यांसारखे विविध प्रकारचे व्यायाम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
लोक वजन कमी करण्यासाठी कर्बोदके किंवा चरबीयुक्त पदार्थ पूर्णपणे खाणे टाळतात, पण यामुळे वजन कमी होण्यास अडथळा येऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा सर्व पोषक तत्वांनी समृद्ध आहार करावा. मात्र याचे प्रमाण तुमच्या लक्षात घ्या.
झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे भूक वाढू शकते आणि वजन वाढू शकते. त्यामुळे व्यायाम, हेल्दी जेवणासोबत पुरेशी झोप घेणेही गरजेचे आहे.
सुकामेवा, सॉस, जंक फूड यांचे सेवन टाळा. यामुळे कॅलरीज वाढू शकतात. खाण्यापूर्वी अन्नाचे प्रमाण मोजून घ्या. जेणेकरून तुम्ही वजन कमी करताना देखील सर्व प्रकारचे अन्न खाऊ शकता.
अनेक पेयांमध्ये लपलेली साखर आणि कॅलरीज असतात. सोडा, ज्यूस आणि गोड कॉफीमुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वेगाने वाढते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटत नाही. त्याऐवजी पाणी किंवा ब्लॅक कॉफीचा पर्याय निवडा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.