Shreya Maskar
दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो पटकन शिजतो आणि त्याला जास्त तेल लागत नाही. फक्त अर्धा - १ चमचे तेलात ही भाजी चांगली शिजते. दुधी भोपळ्यात फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते.
दोडका ही हलकी आणि पटकन शिजणारी भाजी आहे. त्याच्या नैसर्गिक ओलाव्यामुळे त्याला जास्त तेल लागत नाही. ही कमी कॅलरी असलेली भाजी मधुमेही आणि वजन नियंत्रणात करण्यासाठी फायदेशीर आहे.
भेंडी कमी तेलात खूप चांगली शिजते, फक्त ती मंद आचेवर शिजवा. भेंडीमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
कोबी लवकर शिजतो, त्यामुळे त्याला जास्त तेलाची गरज नसते. कोबीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
पालक लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. पालक ही भाजी वाफेवर शिजते, त्यामुळे हा पदार्थ बनवताना अगदी थोडेसे तेल मिक्स करा. यात फायबरचे प्रमाणही जास्त असते.
किसलेला फ्लॉवर मसाल्यांसोबत कोरडा परतून घ्या. तेलाचा वापर न करता तुम्ही भातात फ्लॉवर टाकून फ्लॉवर भात बनवू शकता. याने पोटही भरेल.
ढोबळी मिरची रंगीबेरंगी, कुरकुरीत आणि 'व्हिटॅमिन सी'ने भरपूर असते. अगदी थोड्या तेलात परतून तुम्ही तिच्यापासून कोणताही पदार्थ बनवू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.