Manasvi Choudhary
लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी निरोगी आणि तंदुरूस्त राहणे हे प्रत्येक मुलींसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तंदुरूस्त राहण्यासाठी अनेक मुली वजन कमी करतात. रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करतात.
अनेक मुली लग्नाआधी डायटिंग किंवा तासनतास जिममध्ये घाम गाळतात. मात्र, केवळ खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यापेक्षा जीवनशैलीतील काही महत्त्वाच्या सवयींकडे लक्ष देणे जास्त गरजेचे असते.
सकाळी उठल्यानंतर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण शरीराचे कार्य अवलंबून असते. घाईगडबडीत नाश्ता टाळू नका. सकाळी नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा आवर्जून समावेश करा, ज्यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळेल आणि वारंवार भूक लागणार नाही.
वजन कमी करण्यासाठी शरीर सक्रिय असणे सर्वात महत्त्वाचे आहे. जर व्यस्त शेड्यूलमुळे जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर घरीच योगासने, झुम्बा किंवा डान्स करा.
अनेकजण फक्त तहान लागल्यावरच पाणी पितात मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे. दिवसभर थोडे-थोडे करून पुरेशा प्रमाणात पाणी प्या. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते.
लग्नाची खरेदी किंवा तयारी करताना बाहेर खाणे वाढते. तेलकट, मसालेदार, उघड्यावरचे अन्न, मैदा आणि विशेषतः साखरयुक्त शीतपेये आणि मिठाई खाणे पूर्णपणे टाळा. यामुळे अनावश्यक चरबी वाढणार नाही.
वजन कमी करण्यासाठी आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची असते. लग्नाच्या तणावामुळे झोपेचे गणित बिघडवू नका. दररोज रात्री किमान ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.