Shruti Vilas Kadam
वजन कमी करायचं असेल तर चहा, कॉफीमध्ये कमी साखर घाला. कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि गोड पेय पिणं टाळा.
जेवण सोडू नका. ताटात जास्त भाज्या आणि सॅलड घ्या. सोबत डाळ, कडधान्यं, पोळी किंवा भात खा.
कोथिंबीर बिया, जिरे, ओवा, मेथी आणि दालचिनी एकत्र करून त्याची पावडर तयार करा. एक चमचा पावडर कोमट पाण्यात मिसळून प्या.
रात्रीच्या जेवणात पालक, टोमॅटो किंवा ब्रोकोलीचं सूप घ्या. सोबत थोडं सॅलड किंवा शिजवलेल्या भाज्या खा.
रात्री खूप उशिरा जेवू नका. झोपण्याच्या साधारण तीन तास आधी जेवण करा.
जेवणात डाळी, कडधान्यं, पनीर, दही आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
वजन कमी करण्यासाठी जेवण सोडू नका. तळलेले पदार्थ, जंक फूड आणि गोड पदार्थ कमी खा. रोज चालण्याचा किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.