Messy Bun Hairstyle: लग्नसराईत ट्रेडिशनल ड्रेसवर दिसायचंय सुंदर? फक्त ३० सेकंदांत बनवा मेसी बन हेअरस्टाइल!

Shruti Vilas Kadam

सर्वप्रथम केस विंचरा

मेसी बन बनवण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरून घ्या. केसांमधील गुंता काढून ते डोक्याच्या वरच्या बाजूला एकत्र करा. त्यानंतर रबर बँडच्या मदतीने घट्ट पोनीटेल बांधा.

Messy Bun Hairstyle

दुसऱ्या रबर बँडचा वापर करा

आता पोनीटेलवर दुसरा रबर बँड लावा. मात्र, यावेळी संपूर्ण केस बाहेर काढू नका. केस अर्धेच बाहेर काढून गोल आकाराचा लूप तयार करा.

Messy Bun Hairstyle

उरलेले केस दोन भागांत करा

लूप तयार केल्यानंतर खाली राहिलेले केस दोन भागांत विभागून घ्या. हे केस मेसी बनला सुंदर आकार देण्यासाठी उपयोगी पडतील.

Messy Bun Hairstyle

केसांना गोलाकार गुंडाळा

आता दोन्ही बाजूंचे उरलेले केस लूपच्या भोवती गोलाकार पद्धतीने गुंडाळा. यामुळे केसांचा छान आणि भरदार बन तयार होईल.

messy low bun style

रबर बँडमध्ये केस अडकवा

गुंडाळलेले केस दुसऱ्या रबर बँडमध्ये व्यवस्थित अडकवा. त्यामुळे केस सैल होणार नाहीत आणि तुमचा मेसी बन बराच वेळ टिकून राहील.

Messy Bun Hairstyle

मेसी बनला सुंदर लूक द्या

आता बोटांच्या मदतीने बनमधील केस हलकेच बाहेर ओढा. यामुळे केसांना छान व्हॉल्यूम मिळेल आणि मेसी बन अधिक आकर्षक दिसेल.

Messy Bun Hairstyle

हेअरस्टाइल टिकवण्यासाठी टिप्स वापरा

मेसी बन जास्त वेळ ठेवायची असेल तर केसांवर थोडासा ड्राय शॅम्पू वापरा. पातळ रबर बँडऐवजी चांगला स्क्रंच वापरा. तसेच कपाळाजवळ आणि कानांच्या बाजूला केसांच्या काही बटा मोकळ्या सोडा.

Messy Bun Hairstyle

Best Oil For Frying Puri: सणासुदीला पुऱ्या तळण्यासाठी कोणते तेल वापरावे? हे ५ पर्याय ठरतील आरोग्यासाठी फायदेशीर

Best Oil For Frying Puri | Saam TV
येथे क्लिक करा