Saam Tv
तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असाल. पण वजन वाढण्याचं नेमकं कारण काय हे शोधून काढणं महत्वाचं आहे.
पुढे आपण वजन आपल्या कोणत्या सवयींमुळे वाढत हे जाणून घ्यायला हवं.
सकाळी नाश्ता न केल्यास तुमचे वजन वाढू शकते. दिवसाची सुरुवात कधीही उपाशी पोटी करू नका.
दुपारी जेवल्यानंतर ३० मिनिटांत लगेच झोपू नका. यामुळे शरीर सुस्त होतं आणि वजन वाढतं. त्याऐवजी थोडं चालावं.
दिवसाला ८-१० ग्लास पाणी प्या. पाणी तुमचं नैसर्गिक फॅट बर्नर आहे.
रात्री जेवल्यानंतर शतपावली करावी, जेणेकरून पचन सुधारेल. लगेच झोपणं टाळा.
रोटी, नान, पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ वारंवार खाणं टाळा. सतत असे पदार्थ खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका वाढतो.
गोड आवडतंय? मग फळं खा, साखर खाणं टाळा. "साखर म्हणजेच शरीरासाठी विष.