Saam Tv
दिवसभराच्या कामाचा ताण हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे तुम्ही वयापेक्षा जास्त म्हातारे दिसायला लागता.
या समस्येचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी महत्वाच्या टिप्स आणल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत.
आठवड्यातून एकदा चेहऱ्याला वाफ घ्या.यामुळे त्वचेचे पोर्स उघडण्यास मदत होते.
नियमित व्यायाम करा त्याने चेहऱ्याच्या आजुबाजूचे रक्ताभिसरण सुधारते. नियमित व्यायाम त्वचेला तजेलदार बनवतो.
त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस लावू नका. यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
तेलकट त्वचेसाठी दही, तेल यासारखे पदार्थ टाळा. यामुळे पिंपल्स येण्याचा धोका वाढतो.
मॉइश्चराईझरचा वापर करा. त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे.
रात्री झोपताना मेकअप काढल्याशिवाय झोपू नका. यामुळे त्वचा शुद्ध राहते. तसेच त्वचेनुसार योग्य क्लींझर निवडा. यामुळे त्वचा स्वच्छ राहते.