Saam TV News
२ केळी, २ चमचे पीनट बटर, १ कप दूध आणि मध सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून गुळगुळीत होईपर्यंत चांगले वाटून घ्या. ही स्मूदी प्रोटीनयुक्त असून वजन वाढवण्यासाठी आणि जिम वर्कआउटनंतर ऊर्जा मिळवण्यासाठी उत्तम आहे.
१ कप आंब्याचे तुकडे, २ चमचे ओट्स, १ कप दूध आणि थोडे बदाम. ओट्स १० मिनिटे दुधात भिजवून घ्या, नंतर त्यात आंबा व इतर साहित्य घालून मिक्सरमध्ये बारीक करा. ही स्मूदी फायबर आणि व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
२ केळी, १ चमचा कोको पावडर, १ कप दूध आणि थोडे डार्क चॉकलेट किसलेले. केळी, कोको पावडर आणि दूध एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घ्या व वरून किसलेले चॉकलेट घाला. गोड खाण्याची इच्छा झाल्यावर हा एक हेल्दी आणि चवदार पर्याय आहे, जो मूड फ्रेश करतो.
५-६ बिया काढलेले खजूर, बदाम-काजू, १ कप दूध आणि चिमूटभर वेलची पूड. खजूर दुधात अर्धा तास भिजवून ठेवा आणि सर्व साहित्य एकत्र करून स्मूदी तयार करा. ही हाय-एनर्जी स्मूदी अशक्तपणा दूर करून शरीराला त्वरित ताकद आणि लोह पुरवते.
अर्धी वाटी ताज्या स्ट्रॉबेरी, १ केळी, १ कप दूध आणि मध घ्या स्ट्रॉबेरी आणि केळीचे तुकडे करून दुधासोबत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ही स्मूदी त्वचा निरोगी ठेवण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
२ पिकलेले चिक्कू , १ कप दूध आणि चिमूटभर दालचिनी पूड घ्या चिक्कूचे गर आणि दूध मिक्सरमध्ये एकजीव करून ग्लासमध्ये सर्व्ह करा. चिक्कूमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे ही स्मूदी हाडांच्या बळकटीसाठी आणि थकवा घालवण्यासाठी उत्तम आहे.
१ केळी, आधा कप नारळाचे दूध आणि थोडे ओले खोबरे घ्या. केळी आणि नारळाचे दूध एकत्र करून मिक्सरमध्ये गुळगुळीत होईपर्यंत वाटा. शरीराला उत्तम हायड्रेशन देणारी आणि पचनास हलकी असणारी ही एक चवदार पौष्टिक स्मूदी आहे.
१ सफरचंद (तुकडे केलेले), २ चमचे ओट्स, १ कप दूध आणि चिमूटभर दालचिनी पूड. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि वरून दालचिनी पूड भुरभुरा. फायबरयुक्त असलेली ही स्मूदी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
२ चमचे उकडलेले किंवा भाजलेले रागीचे पीठ, १ केळी, १ कप दूध आणि गूळ , रागीचे पीठ दुधात ढवळून घ्या आणि केळी व गुळ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. कॅल्शियम आणि आयर्न भरपूर असणारी ही स्मूदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
NEXT : कोरडा खोकला सतावतोय? झटपट आरामासाठी हे सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा