Mahabaleshwar Tourism: महाबळेश्वरपासून फक्त २० किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; विकेंडला नक्की प्लान बनवा

Surabhi Jayashree Jagdish

थंड हवेचं ठिकाण

महाबळेश्वरपासून अवघ्या २० किमी अंतरावर एक निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण थंड हवामान, हिरवळ आणि सुंदर दऱ्यांसाठी ओळखलं जातं. याठिकाणी पर्यटकांना विश्रांतीसोबतच विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेता येतो.

Mahabaleshwar nearby places

पाचगणी

पाचगणी हे महाबळेश्वरपासून सुमारे २० किमी अंतरावर वसलेलं सुंदर हिल स्टेशन आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३४ मीटर उंचीवर आहे. याठिकाणी थंड हवामान आणि शांत वातावरण पर्यटकांना मिळतं.

Panchgani tourism

टेबल लँड

टेबल लँड हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे पठार मानले जाते. याठिकाणी घोडेस्वारी, फोटोग्राफी आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. या ठिकाणावरून आसपासच्या दऱ्यांचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं.

Table Land Panchgani

स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध

स्ट्रॉबेरीसाठी पाचगणी आणि महाबळेश्वर परिसर प्रसिद्ध आहे. याठिकाणी ताज्या स्ट्रॉबेरी आणि त्यापासून बनवलेले पदार्थ तुम्हाला खायला मिळतात. हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरी फेस्टिव्हलही आयोजित केला जातो.

strawberry farms Panchgani

सिडनी पॉईंट

सिडनी पॉईंट हे एक लोकप्रिय व्ह्यू पॉईंट आहे. कृष्णा व्हॅली आणि धरणाचं सुंदर दृश्य पाहता येते. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण खास आहे.

Sydney Point Panchgani

पारसी पॉईंट

पारसी पॉईंट हे ठिकाण शांत वातावरणासाठी ओळखलं जातं. याठिकाणी बसून निसर्गाचा आनंद घेताना सुंदर दऱ्या आणि नदीचं दृश्य दिसतं. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Parsi Point Panchgani

राजपुरी गुहा

Rajpuri Caves या गुहा धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जातात. याठिकाणी प्राचीन कुंड आणि मंदिरं पाहायला मिळतात. भक्त आणि पर्यटक दोघांसाठीही हे उत्तम केंद्र आहे.

Rajpuri Caves Panchgani

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा