Sakshi Sunil Jadhav
गणेश उपासना फलदायी असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाला योग्य न्याय मिळेल.
गणेश चतुर्थी व्रतोत्सवाचा आरंभ आज होत आहे. धन सुद्धा घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन शिक्षणासंदर्भात संकल्प होतील.
घरातील सणाच्या धांदलीमध्ये आज तुम्ही व्यस्त रहाल .घरी पाहुण्यांची उठवस होईल. आनंद उत्सव साजरा कराल.
भावंड सौख्य उत्तम राहील. आज जवळचे प्रवास जसे की अष्टविनायक यात्रा, ११ मारुती आपल्याकडून घडणार आहेत. पत्रव्यवहार सुरळीत होतील.
पसा भरून असलेले सुख आज द्विगुणीत होणार आहे. गणेशाच्या आगमनामुळे आज कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक राहील. धनयोग आणि सुवर्ण खरेदी होईल.
नेहमीच चोख कामे करणारी आणि बुद्धिमान अशी असणारी आपली रास. आपला इतरांवर प्रभाव कायम राहील.
सणसमारंभामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. पण गणेशाच्या कृपेने दिवस तुमचा सुलभ आणि मार्गी लागणार हे नक्की.
आज अनेक लाभ आणि वृद्धीचा मानस घेऊन आलेला आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. मेजवानीचे योग येतील.
कामे तर रोजचीच असतात,आज मात्र तुम्ही कामाच्या ठिकाणी धार्मिक गोष्टीत सामाजिक उपक्रमात विशेष सहभाग घ्याल.
अपेक्षित घटना आज गणेशाच्या गणपतीच्या आगमनाने अचानक घडतील. मोठे प्रवास घडण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
अडचणींवर मात करण्याची शक्ती आणि ताकद आज गजानन आपल्याला सहज देणार आहे . अचानक धनलाभ संभवत आहेत.
जोडीदाराबरोबर चांगले जमेल. गणेशोत्सवाच्या निमित्त काहीतरी खरेदी, नव्याने व्यवसायाच्या वाटा सापडणार आहेत.