Sakshi Sunil Jadhav
नवीन आव्हाने स्वीकारायला आपल्याला नेहमीच आवडते मग कोणाची साथ असो म्हणून आपण यशाच्या झेंडा फडकवणार हे नक्की.
वडिलोपार्जित संपत्ती बाबत अडकून पडलेल्या गोष्टी आज चुटकीसरच्या सुटतील आपल्याच घरातील व्यक्तींच्या सहकार्यामुळे मार्ग निघतील. व्यवसायामध्ये मात्र जपून पावले टाकावीत.
आनंदी आणि गुलछबू असणारी आपली रास आहे l. नेहमीप्रमाणे सहज असा दिवस आज जाईल.
सगळे काही छान चालू असताना अचानक माशी शिंकते असे काही ज्या घटना आज घडतील. विनाकारण पैसा खर्च होईल.
सोप्या गोष्टी अजून सोप्या होतील असा काहीसा दिवस आहे. पण आपली धावपळ आणि धडपड ही सुद्धा वाढेल.
सामाजिक कार्यात आपला विशेष रस आहे आणि आज तो वाढता राहील. आपल्या वरिष्ठानकडून विशेष कौतुक होईल.
लक्ष्मी उपासना फलदायी ठरणार आहे. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. दानधर्मामध्ये सुद्धा तेवढ्याच हिरीरीने सहभाग घ्याल.
अडचणींचा सामना करत आजकाल दिवस खूप जात आहेत. एखादा दिवस तरी मनासारखा असावा असे वाटतं.
नोकरी व्यवसायात गती आणि प्रगती होणार आहे. ठरवून केलेल्या गोष्टी होत असताना अडचणींचा सामना करावा लागेल.
नव्याने गोष्टी साकारण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन कल्पना सुचतील. सृजनशीलता वाढेल.
गुरे ढोरे शेतीवाडी याच्या क्रयविक्रियांमध्ये फायदा होईल. मातृसौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
"जे असेल ते असेल नसेल तरी नसेल" आज कोणत्याच गोष्टीविषयी आपली तक्रार राहणार नाही. नवीन गोष्टी मात्र करण्यात आज आघाडीवर असा दिवस असेल.