Sakshi Sunil Jadhav
इतरांच्या सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी विशेष शाबासकीची थाप मिळेल. बढतीची शक्यता आहे.
सून जावयांच्या कौतुकामध्ये आज मश्गुल असाल. जवळचे परिचित स्नेही यांच्याबरोबर आनंदासाठी गाठीभेटीचे योग आहेत. केलेली सर्वच गुंतवणूक आज फायद्याची ठरेल.
"करायला गेलो एक झालं एक" अशा काहीशा गोष्टी आज घडतील. मनस्ताप होण्याची शक्यता आहे. पुढे जाल.
आनंदाची उधळण घेऊन आलेला दिवस आहे. अर्थात यासाठी तुम्हाला स्वतःला अधिक मेहनत घ्यावी लागेल.
आपले केंद्रस्थान आज तुमचे कुटुंबीय असतील. त्यांच्यासाठी विशेष काही गोष्टी करताना धडपडून कराल. मात्र केलेल्या गोष्टीचे चीज होईल.
जवळच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. भावंडसौख्य शेजाऱ्यांची विशेष मदत मिळेल. रेंगाळत पडलेले पत्र व्यवहार आज मार्गी लागतील.
घर जमीन खरेदी-विक्री यासाठी दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे. घरातील पाळीव प्राण्यांपासून विशेष लाभ होईल.
कला क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्रगती संभवते आहे. शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची ठरेल.
नोकरीमध्ये गती मिळेल. शत्रू वाढीस लागणार आहेत. आजोळी प्रेम मिळेल. तब्येत मात्र आज जपावी लागेल.
जबाबदारी आज पेलाव्या लागतील. व्यावसायिक गोष्टी चिकाटी आणि मेहनतीने पुढे जाल. महत्त्वाच्या बैठका पार पडतील.
ज्या गोष्टी सहज हाती लागत नाहीत अशा गोष्टींसाठी आज विशेष प्रयास तुमच्याकडून होईल. सहज सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील.
सद्गुरु कृपा राहील. काही वेळेला साधेपणामुळे आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सहज मिळतात. प्रेमाची वाटणी होणार नाही.