Shruti Vilas Kadam
लो बन ही साधी पण एलिगंट हेअरस्टाईल मानली जाते. साडी, गाऊन किंवा सलवार सूटवर ही स्टाईल खूप आकर्षक दिसते आणि काही मिनिटांत तयार होते.
केसांना हलके कर्ल्स दिल्यास केस अधिक बाउन्सी आणि स्टायलिश दिसतात. लग्नसराईतील पार्टी लुकसाठी ही हेअरस्टाईल उत्तम पर्याय ठरू शकते.
फ्रंट पफ करून उरलेले केस मोकळे सोडल्यास चेहऱ्याला आकर्षक लुक मिळतो. ही स्टाईल पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिट्सवर शोभून दिसते.
साइड ब्रेड किंवा फिशटेल वेणी काही मिनिटांत तयार करता येते. ही हेअरस्टाईल साधी असूनही खूप ट्रेंडी आणि क्लासी दिसते.
लो बन किंवा जुड्यावर गजरा लावल्यास पारंपरिक लुक अधिक खुलून दिसतो. विशेषतः लग्न आणि सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी ही स्टाईल लोकप्रिय आहे.
छोटे क्लिप्स, पिन्स, पर्ल अॅक्सेसरीज किंवा स्टोन हेअरबँड वापरल्यास साधी हेअरस्टाईलही अधिक आकर्षक दिसू शकते.
हेअरस्टाईल जास्त वेळ टिकून राहण्यासाठी हलका हेअरस्प्रे वापरू शकता. त्यामुळे केस सेट राहतात आणि फ्रिझी दिसत नाहीत.