Kharvas Recipe: या उन्हाळ्यात झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट खरवस, वाचा ही सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

खरवस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

खरवस तयार करण्यासाठी चिक (पहिलं दूध), साधं दूध, साखर किंवा गूळ, वेलची पावडर आणि थोडंसं केशर लागते. चव वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्सही वापरू शकता.

kharvas recipe | Saam tv

चिक आणि दूध एकत्र मिसळा

एका भांड्यात चिक आणि साधं दूध एकत्र घ्या. साधारणपणे 1 वाटी चिक आणि 1 वाटी दूध असे प्रमाण ठेवले जाते, जेणेकरून खरवस मऊ तयार होतो.

Coconut Kharvas Recipe

गोडवा आणि फ्लेवर द्या

या मिश्रणात साखर किंवा गूळ घालून चांगले मिसळा. त्यानंतर वेलची पावडर आणि केशर टाकल्यास खरवसाला छान सुगंध आणि स्वाद मिळतो.

Coconut Kharvas Recipe

मिश्रण गाळून घ्या

खरवस अधिक मऊ आणि गुळगुळीत बनवण्यासाठी तयार मिश्रण गाळणीने गाळून घ्या. त्यामुळे गाठी राहत नाहीत आणि टेक्स्चर चांगले तयार होते.

Kharvas Recipe in Marathi | Kharvas Recipe (Without Cheek)

वाफेवर शिजवण्याची पद्धत

तयार मिश्रण एका भांड्यात काढून कुकर किंवा स्टीमरमध्ये 25 ते 30 मिनिटे वाफेवर शिजवा. शिट्टी न लावता मध्यम आचेवर खरवस तयार करावा.

Kharvas Recipe | Social Media

थंड झाल्यावर कापा

खरवस पूर्ण थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी किंवा आवडीप्रमाणे तुकडे करा. थंड खरवस खायला अधिक स्वादिष्ट लागतो.

kharvas recipe | Saam tv

पौष्टिक आणि पारंपरिक गोड पदार्थ

खरवस हा प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त पारंपरिक पदार्थ मानला जातो. सण, खास प्रसंग किंवा पाहुण्यांसाठी हा गोड पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतो.

Kharvas Benefits for Health | Saam TV

Face Care: नॅचरल सॉफ्ट चेहऱ्यासाठी वापरा 'हा' घरी तयार केलेला फेसपॅक, ४ दिवसात दिसेल फरक

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा