Shruti Vilas Kadam
एका भांड्यात 2 चमचे बेसन, 1 चमचा मध, काही थेंब बदाम तेल आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा.
बेसन त्वचेवरील धूळ, अतिरिक्त तेल आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि ताजीतवानी दिसू शकते.
मध त्वचेला नैसर्गिक ओलावा देण्याचे काम करतो. कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी मध उपयुक्त मानला जातो.
बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेला पोषण मिळून त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी दिसण्यास मदत होऊ शकते.
गुलाबपाणी त्वचेचा पीएच बॅलन्स राखण्यास मदत करते. तसेच त्वचेवरील थकवा कमी करून फ्रेश लुक देण्यास उपयोगी ठरू शकते.
तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर समान प्रमाणात लावा. 15 ते 20 मिनिटांनी फेसपॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
हा फेसपॅक आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास त्वचेवरील निस्तेजपणा कमी होऊन नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होऊ शकते. संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करावी.