Shruti Vilas Kadam
कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना जाणवते. अशावेळी केमिकलयुक्त हेअर डायऐवजी चहा आणि कॉफीचा नैसर्गिक उपाय वापरला जाऊ शकतो.
नैसर्गिक हेअर कलर तयार करण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. त्यात 2 चमचे चहा पावडर आणि 2 चमचे कॉफी पावडर टाकून मिश्रण चांगले उकळून घ्या.
मिश्रण गडद रंगाचे झाल्यानंतर ते थंड होऊ द्या. त्यानंतर गाळून स्वच्छ भांड्यात काढा, जेणेकरून केसांवर लावताना त्रास होणार नाही.
केस स्वच्छ धुतल्यानंतर हे मिश्रण ब्रश किंवा कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांवर लावा. विशेषतः पांढऱ्या केसांवर नीट लावणे महत्त्वाचे आहे.
हे मिश्रण केसांवर किमान 30 ते 40 मिनिटे ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. लगेच शॅम्पू वापरणे टाळावे.
चहा आणि कॉफीमुळे केसांना नैसर्गिक गडद छटा मिळण्यास मदत होऊ शकते. तसेच केस अधिक मऊ, चमकदार आणि फ्रिझ-फ्री दिसू शकतात.
हा उपाय आठवड्यातून 1 ते 2 वेळा केल्यास चांगला परिणाम दिसू शकतो. मात्र संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.