ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात लग्न करणे हा नवरा- नवरीच्या आयुष्यातील महत्त्वाचा संस्कार मानला जातो.
लग्नात प्रत्येक विधीला विशेष महत्त्व असतं. लग्नात नवरीला हिरवा चुडा घालण्याची पद्धत आहे.
लग्नानंतर हातात हिरवा चुडा घालण्याला खूप महत्त्व आहे.
'पहिले कंगण सौभाग्याचे भूषण', असा मंत्र नवविवाहित महिलेला तिची पाठवणी करताना देतात.
कंकण हे सौभाग्याचे भूषण मानले जाते. सौभाग्यवती स्त्रिने रिकाम्या हाताने कधीच राहू नये, असं अनेक लोक म्हणतात.
हिरवा रंग हा ताजेपणा, निसर्ग आणि सकारात्मतेचे प्रतीक मानले जाते.
हिंदू धर्मात बांगड्या नवीन नवरीचं वाईट नजरेपासून संरक्षण करतात.
लग्नानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे नवविवाहित जोडप्याचा संसार सुखाचा होतो, असे अनेक लोक म्हणतात.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीचे साम टीव्ही समर्थन करत नाही.