Manasvi Choudhary
सोशल मिडिया हे असं माध्यम आहे ज्यावर एका क्षणात कोणतीही गोष्ट व्हायरल होते.
सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. जो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
'शादी के बाजार' या नावाने सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे ऐकून तु्म्हालाही वाटेल काय , मुला- मुलीचा बाजार मांडला आहे का? तर हो, हे खरं आहे.
चीनमध्ये एक बाजार भरतो त्याला 'दुल्हे- दुल्हन का बाजार' असं म्हटलं जातं. एका शहरात हा बाजार भरवला जातो.
नेमका का हा बाजार भरतो? काय आहे यामागचं कारण? थोडक्यात जाणून घ्या.
सोशल मिडिया @syedshanalig या अकाऊंटवरून व्हायरल होत असलेल्या या दृश्यात तुम्ही पाहू शकता की, रंगीबेरंगी कागद लटकवलेले आहेत.
पांढऱ्या, निळ्या आणि केशरी रंगातील हे पेपर मुला-मुलींचे बायोडेटा असल्याची माहिती आहे.
लग्नासाठी मुलगा- मुलगी शोधण्यासाठी लोक येथे येतात. बायोडेटा बघितल्यानंतर मुलगी पंसत करतात.
मुलगी पसंत केल्यानंतर तेथील दुकानदाराला सांगतात. नंतर दुकानदार दोन्ही परिवाराची भेट घालून देतो. लग्न ठरल्यानंतर दुकानदार पैसे घेतात.