ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धावपळीच्या जीवनशैलीमुळे रोज प्रत्येकाची कामानिमित्त धडपड सुरु असते. या कामाचा तणाव आपल्या शरीरासोबत डोळ्यांवरही होतो. त्यामुळेही आपला डोळा फडफडू शकतो.
कामामुळे अनेकवेळा झोप अपुरी राहते त्यामुळे शरीराला थकवा जाणवतो. यामुळेही डोळा फडफडू शकतो.
डोळ्याला दुखापत झाली असून त्यात कधी कधी दुखापत बरी न झाल्यामुळे एलर्जी होऊन डोळा फडफडतो.
अनेकांना सतत चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते तर त्यामुळेही डोळा फडफडण्याचा त्रास होतो.
आपल्याला चष्मा असल्यास योग्य ती डोळ्यांची काळजी न घेतल्यासही डोळा फडफडतो.
लॅपटॉप ,कंम्यूटर आणि स्मार्ट फोनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांना कोरडेपणा जाणवून डोळा फडफडतो.
आपल्या शरीराला लागणाऱ्या मॅग्नेशियमची मात्रा जर योग्य प्रमाणात भरली गेली नाही, तरी डोळा फडफडतो