ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा पचन क्रियेसंबंधित समस्या अनेकांना असतात, त्यामुळे त्यांनी रोज सब्जाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
रोज सकाळी सब्जाचे पाणी प्यायल्याने चेहरा उजळण्यास मदत होते.
सब्जामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. (डिस्क्लेमर : उपलब्ध माहितीच्या आधारावर वरील माहिती देण्यात आली आहे. साम टीव्ही डिजिटल या माहितीची पुष्टी करण्याचा दावा करत नाही)
यात प्रोटीनसह अमिनो अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने दैनंदिन जीवनात फायदा होतो.
सब्जाचे पाणी नियमित प्यायल्याने हृदय विकाराच्या समस्येपासून काही प्रमाणात दूर राहता येते.
सब्जाच्या बियांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
सब्जाचे पाणी नियमित प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.