ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतेकदा असे मानले जाते की, गिफ्टमध्ये घड्याळ दिल्याने ज्याला आपण गिफ्ट देतो त्याची प्रगती थांबविण्याची शक्यता असते.
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या खास व्यक्तीला डुबणाऱ्या जहाजाचा फोटो किंवा शोपिस दिल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
काळ्या रंगाचा शर्ट, टीशर्ट जर आपण बॉयफ्रेंडला दिला तर त्याच्या आयुष्यात कष्ट, दु:खाचा शिरकाव होतो.
बॉयफ्रेंडसाठी शुज घेण्याचा विचार करत असाल तर देऊ नये ,असे केल्यास नातं तुटण्याची शक्यता असते.
बॉयफ्रेंडला परफ्यूम दिल्याने त्याच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टीचा प्रभाव पडतो
आपण बॉयफ्रेंडला रूमाल जर त्याला कामाला येईल या विचाराने देत असाल तर ते आपल्या नात्यात दु:खाचे कारण मानले जाईल.
बाजारात अनेक महागातले पेन उपलब्ध असतात, बॉयफ्रेंडला गिफ्ट म्हणुन पेन दिल्याने त्याला येणाऱ्या कामाच्या संधी निघून जाऊ शकतात.
भेटवस्तू म्हणून जर पाकीट देत असाल त्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.