टाईट बेल्ट लावणं पडेल महागात; पुरुषांच्या फर्टिलीवर गंभीर परिणाम

Surabhi Jayashree Jagdish

बेल्ट

बहुतांश पुरुष जे जीन्स किंवा पॅन्ट घालतात ते बेल्ट लावतात. काही लोक फॅशनसाठी बेल्ट वापरतात तर काहीजण पॅन्टची फिटिंग योग्य राहावी म्हणून बेल्ट लावतात.

आरोग्यासाठी घातक

काही लोकांना घट्ट बेल्ट लावण्याची सवय असते. पण त्यांना हे माहित नाहीये की, यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ही सवय दीर्घकाळात शरीरावर नकारात्मक परिणाम करते.

रिप्रोडक्टीव्ह सिस्टीम

घट्ट बेल्ट लावल्याने पुरुषांना कोणत्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागतं ते पाहूयात. तज्ज्ञ सांगतात की, घट्ट बेल्ट बांधल्याने कंबरेभोवतीचं तापमान वाढतं. यामुळे स्पर्म्स संख्या कमी होते आणि त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या रिप्रोडक्टीव्ह सिस्टीमवर होतो

कंबरदुखी

दीर्घकाळ घट्ट बेल्ट लावल्याने पाठीच्या कण्यावरही परिणाम होतो. त्यामुळे कंबरदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या हळूहळू गंभीर रूप धारण करू शकते.

सांध्यांमध्ये वेदना

इतकेच नव्हे तर घट्ट बेल्ट बांधल्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होण्याची समस्या उद्भवते. शरीरातील हालचालींवर त्याचा परिणाम होतो.

पचनाशी संबंधित समस्या

संशोधनानुसार जे लोक जाड असतात आणि घट्ट बेल्ट लावतात त्याचा थेट परिणाम त्यांच्या अन्ननलिकेवर होतो. यामुळे त्यांना पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात.

सवय बदला

जर तुम्हीही घट्ट बेल्ट लावत असाल तर ही सवय त्वरित बदलून टाका. यामुळे तुमचे आरोग्य सुरक्षित राहील आणि शरीरावर अनावश्यक ताण येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा