ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्ट्रोक येण्याआधी वेळीच याची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. यामुळे एखाद्याचा जीव वाचवला जाऊ शकतो.
अचानक हात किंवा पायांमध्ये अशक्तपण जाणवणे, सुन्नपणा किंवा हात किंवा पायात मुंग्या येणे हे स्ट्रोकचे एक प्रमुख लक्षण आहे.
अचानक तीव्र डोके दुखणे, चक्कर येणे, उलट्या होणे किंवा मळमळ होणे हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
अचानक बोलणे बंद होणे, बोबडे बोलणे किंवा शब्द समजण्यास अडचण येणे. हे स्ट्रोकचे लक्षण आहे याकडे दुर्लक्ष करु नका.
स्मरणशक्ती कमी होणे किंवा सामान्य गोष्टी समजण्यास अडचण येणे. मानसिक आरोग्यात बदल होणे देखील स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
स्ट्रोक येण्याआधी अचानक अंधुक दृष्टी,डबल व्हिजन किंवा एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अस्पष्ट दिसणेअशी लक्षणे जाणवतात.
तोल जाणे, अचानक पडणे आणि चालण्यात किंवा उभे राहण्यात अडचण येणे ही स्ट्रोकची गंभीर लक्षणे आहेत.