Weak Urine Flow : लघवीचा वेग अचानक कमी झालाय? दुर्लक्ष करू नका, गंभीर समस्येचे असू शकते संकेत!

Manasvi Choudhary

युरिन समस्या

शरीरातील युरिनची प्रक्रिया सुरळीत चालणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण मानले जाते. परंतु, अनेकदा युरिनचा वेग कमी होणे, युरिन सुरू होण्यास वेळ लागणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

urine | pinterest

युरिनचा वेग कमी होण्यामागचे कारण काय?

युरिनचा वेग कमी होणे याकडे सुरुवातीला सामान्य समजून दुर्लक्ष करतात, परंतु कालांतराने हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत ठरू शकते. युरिनचा वेग मंदावण्यामागे कोणती कारणे असू शकतात. ते या वेबस्टोरीतून समजून घ्या.

urine Flow | pinterest

बिनाइन प्रोस्टेट हायपरप्लासिया

लघवीचा वेग कमी होण्याचे कारण म्हणजे बिनाइन प्रोस्टोट हायपरप्लासिया. म्हणजेच वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथी सामान्य आकारापेक्षा मोठी होते. यामुळे मूत्रमार्गावर दाब पडतो आणि लघवीचा प्रवाह कमी किंवा मंद होतो.

BPH - Prostate Enlargement | saam tv

मूत्राशय योग्य रित्या काम न करणे

जर मूत्राशयाचे स्नायू कमजोर झाले असतील, तर ते लघवी बाहेर येण्यासाठी पुरेसा दाब निर्माण करू शकत नाहीत. यामुळे लघवीचा वेग मंदावतो किंवा मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही.

Bladder Dysfunction | pinterest

मूत्रमार्गाच्या मुखात किंवा नळीत अडथळा

मूत्रमार्गात संसर्ग, जखम किंवा व्रण पडल्यामुळे मूत्रमार्गाचा मार्ग संकुचित होतो. यामुळे लघवी बाहेर पडताना अडथळा निर्माण होतो

Urethral Stricture or Blockage | Saam Tv

मूत्राशयातील खडे

मूत्राशयात किंवा मूत्रपिंडात खडे तयार झाल्यास ते लघवीच्या प्रवाहात अडकतात, ज्यामुळे लघवीचा वेग अचानक कमी होतो किंवा लघवी मध्येच थांबते.

Bladder Stones

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Vastu Tips For Kitchen: स्वयंपाकघरामध्ये मीठ, हळद आणि तांदूळ कुठे ठेवावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य जागा कोणती?

Vastu Tips For Kitchen
येथे क्लिक करा...