Shreya Maskar
उन्हाळ्यात बाहेरून पिण्यासाठी घरीच सिंपल पद्धतीने झटपट वॉटरमेलन मोजिटो बनवा.
वॉटरमेलन मोजिटो बनवण्यासाठी कलिंगड, साखर, लिंबाचे तुकडे, पुदिन्याची पाने, बर्फाचे तुकडे आणि सोडा इत्यादी साहित्य लागते.
वॉटरमेलन मोजिटो बनवण्यासाठी सर्वप्रथम कलिंगडाची साल काढून फळाचे बारीक तुकडे करून घ्या.
आता मिक्सरच्या भांड्यात कलिंगड, लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि साखर टाकून बारीक पेस्ट करा.
कलिंगडचे मिश्रण गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या.
काचेच्या भांड्यात कलिंगडाचा रस टाकून बर्फाचे तुकडे मिक्स करा.
यात आवश्यकतेनुसार सोडा टाकून मिक्स करा.
शेवटी यात कलिंगडचे बारीक तुकडे देखील टाकू शकता.