Shreya Maskar
कारल्याचे वेफर्स बनवण्यासाठी कारले, कॉर्न फ्लोअर, धने पावडर, लाल तिखट, जिरे पावडर, हळद, रिफाइंड तेल आणि तांदळाचे पीठ इत्यादी साहित्य लागते.
कारल्याचे वेफर्स बनवण्यासाठी सर्वप्रथम कारले धुवून गोलाकार बारीक कापून घ्या.
कारल्यातील सर्व बिया काढा म्हणजे वेफर्स कडू लागणार नाही.
कारल्याचे काप मिठाच्या पाण्यात ५-१० मिनिटे बुडवून ठेवा, जेणेकरून कडूपणा पूर्णपणे निघून जाईल.
आता वेफर्स कोरडे करून त्यावर धणे, हळद, जिरे, लाल तिखट आणि मीठ टाका.
एका ताटात तांदळाचे पीठ आणि कॉर्न फ्लोअर मिक्स करा.
या मिश्रणात कारल्या काप घोळवून घ्या.
पॅनमध्ये रिफाइंड तेल गरम करून त्यात कारल्याचे वेफर्स तळून घ्या.