Shreya Maskar
दुधी भोपळ्याप्रमाणे दुधी भोपळ्याची सालं देखील खूप पौष्टिक असते.
दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी दुधी भोपळ्याची साल, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, काळं मीठ, लिंबाचा रस आणि लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.
दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम भोपळ्याची साल स्वच्छ धुवून घ्या.
मिक्सरला दुधी भोपळ्याची साल, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं वाटून त्याची पेस्ट बनवा.
ही पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात काळे मीठ आणि लसूण घाला.
या मिश्रणात एक चमचा लिंबाचा रस पिळा.
अशाप्रकारे चटपटीत दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी तयार झाली.
गरमागरम पराठा आणि चपातीसोबत तुम्ही दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी खाऊ शकता.