Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Surabhi Jayashree Jagdish

छत्रपती संभाजीनगर

पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होतो आणि डोंगर-दऱ्यांचे सौंदर्य खुलून दिसतं. अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे वाहू लागल्याने निसर्गरम्य वातावरण तयार होतं. त्यामुळे निसर्ग पर्यटन आणि विकेंड ट्रिपसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.

monsoon tourism Maharashtra | saam tv

पावसाळी पर्यटन

छत्रपती संभाजीनगरच्या आसपास ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. किल्ले, लेणी, अभयारण्यं आणि टेकड्या यामुळे पर्यटकांना विविध अनुभव मिळतात

best places to visit in monsoon | saam tv

गौताळा अभयारण्य

गौताळा अभयारण्य हे सातमाळा पर्वतरांगांमध्ये वसलेलं समृद्ध वनक्षेत्र आहे. याठिकाणी विविध प्रकारचे वन्यप्राणी, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती आढळतात. पावसाळ्यात दाट हिरवळ आणि धबधब्यांमुळे हे ठिकाण विशेष आकर्षक दिसते.

weekend getaway Maharashtra | saam tv

पितळखोरा लेणी

पितळखोरा लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी एक मानली जातात. ही लेणी डोंगरकपारीत कोरलेली असून त्यावरील शिल्पकला पर्यटकांना फार आवडते. पावसाळ्यात लेण्यांच्या परिसरात वाहणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग मन मोहून टाकतो.

fort tourism Maharashtra | saam tv

गोगाबाबा टेकडी

गोगाबाबा टेकडी ही छत्रपती संभाजीनगर शहराजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. टेकडीवरून शहराचे विहंगम दृश्य आणि आसपासचा निसर्ग पाहता येतो. पावसाळ्यात येथील थंड वातावरण आणि हिरवळ पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

cave tourism Maharashtra | saam tv

दौलताबाद किल्ला

दौलताबाद किल्ला हा भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. किल्ल्याची मजबूत तटबंदी, चांदमिनार आणि ऐतिहासिक वास्तुरचना पाहण्यासारखी आहे. पावसाळ्यात किल्ल्याभोवती पसरलेली हिरवाई त्याचे सौंदर्य आणखी वाढवते.

eco tourism destinations

म्हैसमाळ

म्हैसमाळ हे मराठवाड्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. समुद्रसपाटीपासून उंचावर असल्याने याठिकाणी वर्षभर आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळतं. पावसाळ्यात धुक्याची चादर, हिरव्यागार दऱ्या आणि नयनरम्य दृश्यांमुळे हे ठिकाण पर्यटकांचं आवडतं ठरतं.

rainy season attractions | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

left arm pain heart attack | saam tv
येथे क्लिक करा