Shruti Vilas Kadam
या वयातील बाळांना आईच्या दुधातून किंवा फॉर्म्युला मिल्कमधून आवश्यक पाणी मिळते. त्यामुळे त्यांना वेगळे पाणी देण्याची गरज नसते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळाला पाणी देऊ नये.
सहा महिन्यांनंतर आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क यासोबत थोडे-थोडे पाणी देता येते. दिवसभरात साधारण ०.८ लिटर पाण्याची गरज असते.
या वयातील मुलांनी दिवसभरात साधारण १.३ लिटर पाणी घ्यावे. यामध्ये दूध, फळे आणि इतर पदार्थांमधून मिळणाऱ्या पाण्याचाही समावेश होतो.
या वयातील मुलांना दररोज साधारण १.७ लिटर पाण्याची गरज असते. मुलांना शाळेत जाताना पाण्याची बाटली द्या.
या वयात मुलांची शारीरिक वाढ वेगाने होते. त्यामुळे त्यांना पाण्याची गरज जास्त असते. ९ ते १३ वर्षांच्या मुलांना साधारण २.१ ते २.४ लिटर, तर १४ ते १८ वर्षांच्या मुलांना २.३ ते ३.३ लिटर पाण्याची गरज असते.
या वयातील महिलांनी दररोज साधारण २.७ लिटर, तर पुरुषांनी ३.७ लिटर पाणी घ्यावे. यामध्ये फक्त पिण्याचे पाणीच नाही, तर अन्न आणि इतर पेयांमधून मिळणाऱ्या पाण्याचाही समावेश होतो.
वय वाढल्यानंतर अनेकदा तहान कमी लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तहान लागण्याची वाट न पाहता थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पाणी प्यावे.