Lakshmi Puja Tips: लक्ष्मी पूजनाला नकळतही आणू नका 'या' वस्तू; यामुळे होऊ शकतो लक्ष्मी मातेचा अपमान, वेळीच चुकं सुधारा

Shruti Vilas Kadam

तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका

लक्ष्मी पूजनाच्या वेळी देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ आणि सुस्थितीत असावा. तुटलेली, खंडित किंवा खराब झालेली मूर्ती पूजेसाठी ठेवू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे पूजेपूर्वी मूर्तीची तपासणी करा.

Lakshmi Puja Tips

सुकलेली फुले वापरू नका

देवीच्या पूजेमध्ये ताज्या फुलांना विशेष महत्त्व आहे. सुकलेली, कोमेजलेली किंवा शिळी फुले पूजेसाठी वापरणे टाळावे. पूजेसाठी नेहमी ताजी आणि स्वच्छ फुले निवडावीत.

Lakshmi Puja Tips

अस्वच्छ पूजेचे साहित्य वापरू नका

लक्ष्मी पूजनासाठी वापरल्या जाणाऱ्या ताट, कलश, घंटा आणि इतर साहित्याची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. मळलेले किंवा अस्वच्छ साहित्य वापरण्याऐवजी ते आधी स्वच्छ करून घ्यावे.

Lakshmi Puja | pinterest

तुटलेले दिवे आणि पणत्या लावू नका

दिवाळीच्या पूजेमध्ये दिवे आणि पणत्यांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे तुटलेल्या किंवा खराब झालेल्या पणत्या वापरणे टाळावे. पूजेसाठी स्वच्छ आणि व्यवस्थित पणत्यांची निवड करावी.

Lakshmi Puja Tips

फाटलेले किंवा अस्वच्छ कापड वापरू नका

पूजेदरम्यान देवीच्या मूर्तीखाली किंवा पूजेच्या चौकीवर स्वच्छ वस्त्र अंथरावे. फाटलेले, मळलेले किंवा खराब झालेले कापड वापरणे टाळावे. पूजेच्या साहित्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व द्यावे.

Lakshmi Puja Tips

शिळे नैवेद्य अर्पण करू नका

देवी लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करताना ताजे आणि स्वच्छ पदार्थ तयार करावेत. शिळे किंवा खराब झालेले अन्न नैवेद्य म्हणून ठेवू नये. नैवेद्य तयार करताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

Lakshmi Puja Thali

पूजेच्या ठिकाणी कचरा किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका

लक्ष्मी पूजनाच्या वेळी पूजेची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. पूजेच्या देवाऱ्याजवळ कचरा, धूळ किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. घराचा मुख्य दरवाजा आणि पूजेचे ठिकाण स्वच्छ ठेवावे.

Lakshmi Puja

Diwali Weight Loss Tips: कितीही फराळ खाल्ला तरी वजन वाढणार नाही, फक्त घरी १० मिनिटं करा 'हा' एक व्यायाम

Diwali Weight Loss Tips | Saam Tv
येथे क्लिक करा